सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे शोभायात्रेचे स्वागत!विठ्ठल मंदिर परिसरात रॅलीचे उत्साहात स्वागत; भाविकांना पाण्याचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी) : भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जयंती उत्सव आणि शोभायात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅली विठ्ठल मंदिर परिसरात पोहोचताच मंदिर संस्थानच्या वतीने रॅलीतील सहभागी मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना व भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, तसेच त्यांची पाण्याची गरज भागावी, या सामाजिक भावनेतून विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे रॅलीतील सहभागी नागरिकांना दिलासा मिळाला.

याप्रसंगी मंदिर संस्थानचे ट्रस्टी श्री. सुहास फालक, प्रशांत बऱ्हाटे, गणेश बऱ्हाटे , नितीन तसेच विठ्ठल मंदिर परिसरातील सर्व भाविक, महिला-पुरुष मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या रॅलीच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर संस्थानने केलेला पाण्याच्या वाटपाचा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला.