भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रचे माजी मुख्य अभियंता व संघटनेचे सल्लागार डॉ .आर.आर. बावस्कर यांना मानद डॉक्टररेट डिग्री प्रदान करण्यात आली त्या बद्दल त्याचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार, प्रदेश सचिव उस्मान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तायडे, प्रदेश कोशाध्यक्ष मनसाराम् कोळी याच्या सह स्थानिक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी काही नवीन कंत्राटदाराने संघटनेत प्रवेश केला त्यामध्ये
दिनेश एखारे, मुकेश इंगळे, स्वप्नील पारधी, गणेश बावस्कर यांनी प्रवेश केला.
त्यावेळी प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार यांनी सदर बैठकीला मार्गदर्शन करताना नवीन कंत्राटदारांना संघटनेच्या ध्येय धोरणा बद्दल माहिती दिली.तसेच कंत्राटदाराने व्यसनापासून दूर कसे राहता येइल याकरिता स्वतः प्रयत्न केला पाहिजे आणि स्थानिक पातळीवर सर्व कंत्रदारानी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे असे तसेच कामत स्थानिकन प्राधान्य द्यावे या करीता पाठपुरवठा केला जाईल. नवीन कंत्राटदारानच्या अडीअडचणीवर चर्चा झाली. चर्चेत डॉ. आर. आर. बावस्कर यांनी सर्व कंत्राटदारांना मोलाचे मार्गदर्शन केले. संघटनेच्या प्रत्येक
कंत्राटदाराला मदतीसाठी संघटना बांधील राहील. असे आश्वासन प्रकाश सरदार यांनी दिले.
बैठक यशस्वितेसाठी दिनेश इखारे, रमेश खंडारे, गणेश बावस्कर, राजू मेश्राम, स्वप्नील पारधी, मुकेश इंगळे, परिश्रम घेतले.



