भुसावळ नगरपरिषद निवडणूक : भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळेंचा दणदणीत विजय

भुसावळ (प्रतिनिधी)
भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत अत्यंत नाट्यमय व धक्कादायक निकाल लागला असून गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला मतदारांनी जोरदार नकार दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्री भंगाळे यांनी भाजपच्या उमेदवार रजनी सावकारे यांचा तब्बल १,८४७ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याने भाजपची सरशी दिसून येत होती. मात्र दुपारी एक वाजल्यानंतर चित्र पालटले. नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीत गायत्री भंगाळे यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवत विजय निश्चित केला.

या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे भाजपचे २७ नगरसेवक निवडून आले असतानाही नगराध्यक्ष पद भाजपच्या हातातून निसटले आहे. भुसावळच्या दक्षिण भागात भाजपचे पारंपरिक मतदार राष्ट्रवादीकडे वळल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

या निवडणुकीकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेसह भाजपने मोठी ताकद लावली होती. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तीव्र विरोध, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि अंतर्गत असंतोष याचा फटका भाजपला बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या निकालामुळे मंत्री सावकारे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भुसावळच्या राजकारणात हा निकाल मोठा बदल घडवणारा ठरला आहे.

प्रभागनिहाय निकाल (संक्षेप)

प्रभाग १ (अ, ब) : पूजा तायडे (१३६८), गिरीश महाजन (१५०९)

प्रभाग २ (अ, ब) : उल्हास पगारे (१५५०), प्राची पाटील (१३०१)

प्रभाग ३ (अ, ब) : शांताबाई सुरवाडे (१६५९), काजल मोरे (९७१)

प्रभाग ४ (अ, ब) : अर्चना सातदिवे (१८३), आशिष ईश्वरलाल पटेल (२०४)

प्रभाग ५ : शोभा इंगळे (१४४३), परिक्षित बऱ्हाटे (बिनविरोध)

प्रभाग ६ (अ, ब) : सोनम इंगळे (१७९६), विशाल नाटकर (१७१५)

प्रभाग ७ : प्रिती पाटील (बिनविरोध), सुजित भोळे (१९१४)

प्रभाग ८ (अ, ब) : अनिता सपकाळे (४५८६), शारदा धांडे (२८५२)

प्रभाग ९ (अ, ब) : युवराज लोणारी (२२३५), पूनम वसंत पाटील (२१२७)

प्रभाग १० (अ, ब) : सोनी बारसे (२७१८), प्रिया चौधरी (२७८९)

प्रभाग ११ (अ, ब) : बबलू बराटे (१७२८), मेघा वाणी (१९८१)

प्रभाग १२ (अ, ब) : दिलनबाज शेख (३४२०), असिफ खान (२३६५)

प्रभाग १३ (अ, ब) : रोहन सूर्यवंशी (१८३६), सुनिता कर (११९२)

प्रभाग १४ (अ, ब) : राजेंद्र आवटे (१८५५), सुभद्रा गुंजाळ (१५३२)

प्रभाग १५ (अ, ब) : अमिन निसार कुरेशी (१९६३), शेख नसीम (२०६४)

प्रभाग १६ (अ, ब) : सचिन पाटील (१८९७), पल्लवी कोलते (१७४९)

प्रभाग १७ (अ, ब) : अकील पिंजारी (२०९७), शबानाबी खान (१९९०)

प्रभाग १८ (अ, ब) : आश्रम बानो कुरेशी (१६२१), खान सोईल शेख नसीम (१२६३)

प्रभाग १९ (अ, ब) : पुष्पा कैलास चौधरी (१९८७), सचिन संतोष चौधरी (२१२३)

प्रभाग २० (अ, ब) : असीमा प्रशांत नरवाडे (२०३८), राज विजय चौधरी (अपक्ष) (१५२८)

प्रभाग २१ (अ, ब) : शैलजा नारखेडे (१८५५), निर्मल कोठारी (बिनविरोध)

प्रभाग २२ (अ, ब) : महेंद्रसिंग ठाकूर (४१८४), मानवी अमित अहुजा (२४७९)

प्रभाग २३ : महिमा अजय नागराणी (बिनविरोध), प्रकाश रमेशलाल बत्रा (२०१३)

प्रभाग २४ (अ, ब) : किरण भागवत कोलते (२९३२), सुषमा उमेश नेमाडे (१५५५)

प्रभाग २५ (अ, ब) : सोनल रमाकांत महाजन (२९४४), डॉ. छाया मुरलीधर फालक (२६७७)

हा निकाल भुसावळ नगरपरिषदेच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारा ठरला असून येत्या काळात स्थानिक राजकारणाची दिशा बदलणारा मानला जात आहे.