फुलगाव (प्रतिनिधी):
भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने फुलगाव येथील पुष्पलता नगर परिसरात आज दि. २० डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय संत गाडगे महाराज व माता भिमाई यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांच्या हस्ते संत गाडगे महाराज व माता भिमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन विभाग) प्रकाश सरदार यांनी संत गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेविरुद्ध केलेला संघर्ष, तसेच समाजात शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. गाडगे महाराजांनी जनसामान्यांना स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक जाणीवेचा संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचे जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, मेजर रमेश साळवे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे, चंदा खंडारे यांच्यासह पुष्पलता नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वाती इंगळे, वर्षा सोनवणे, साधना इंगळे, विमल इंगळे, ज्योती इंगळे, शोभा इंगळे, माया तायडे, शोभा निकम, गंगुबाई तायडे, सुनीता जोहर, संगीता निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.


