भुसावळ (प्रतिनिधी ) –
श्री शिवाजी छात्रालय संचालित राजर्षी श्री गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब ओगले हे होते. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. यावेळी श्री. नितीन ओव्हाळ सर यांनी गाडगेबाबांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांची सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात भैय्यासाहेब ओगले यांनी स्वच्छता आणि शिक्षण या विषयांचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा मालुंजकर मॅडम यांनी प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमास प्राथमिक मुख्याध्यापिका लीना वानखेडे मॅडम, माध्यमिक मुख्याध्यापक के. आय. पाटील सर, रंजना पाटील, राजेश तपकीरे, राहुल लोणाग्रे, कैलास तांबट, अरविंद पाटील, नानासाहेब पाटील, रवी तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने स्वागत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. राहुल लोणाग्रे सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेने पार पडला.



