भुसावळ नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ४ ब व ११ ब मध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.८४ टक्के मतदान

भुसावळ (प्रतिनिधी ) – अ वर्ग दर्जा प्राप्त भुसावळ नगरपरिषदेच्या रखडलेल्या दोन प्रभागांसाठी शनिवारी २० डिसेंबर रोजी सकाळी मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली असून दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण ३२.८४ टक्के मतदान झाले असल्याची अधिकृत माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दर दोन तासांच्या टप्प्यांनुसार मतदानाची एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे —
सकाळी ७.३० ते ९.३०
स्त्री मतदार : १०२
पुरुष मतदार : १८७
तृतीयपंथी मतदार : ०
एकूण मतदान : २८९
मतदान टक्केवारी : ३.४५%
सकाळी ७.३० ते ११.३०
स्त्री मतदार : ३७८
पुरुष मतदार : ५१६
तृतीयपंथी मतदार : ०
एकूण मतदान : ८९४
मतदान टक्केवारी : १०.६७%
सकाळी ७.३० ते दुपारी १.३०
स्त्री मतदार : ७६४
पुरुष मतदार : ९२३
तृतीयपंथी मतदार : ०
एकूण मतदान : १,६८७
मतदान टक्केवारी : २०.१३%
सकाळी ७.३० ते दुपारी ३.३०
स्त्री मतदार : १,२९८
पुरुष मतदार : १,४५४
तृतीयपंथी मतदार : ०
एकूण मतदान : २,७५२
मतदान टक्केवारी : ३२.८४%
मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात असून आतापर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ आणि ११ ‘ब’ मधील मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


