भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव एमआयडीसी रोडवर संता पाटील यांच्या शेताजवळ मंगळवार, 16 सकाळी 8.30 च्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. रोशन रतन तायडे (20, साकेगाव एमआयडीसी रोड, ता. भुसावळ) असे जखमीचे नाव आहे. रोशन तायडे हा युवक दुचाकीवरून जात असताना अज्ञात कार (क्रमांक एम.एच.19 बी.यु.7349) वरील चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवता समोरून धडक दिली. धडकेनंतर दुचाकीचे मोठे नुकसान झाले तर रोशन तायडे जखमी झाल्याने यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर कार चालकाने जखमीस मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.



