भुसावळातील दोन प्रभागात निवडणूक : 11 ईव्हीएम सील –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिकेच्या प्रभाग 4 व 11 ब मध्ये शनिवार, 20 रोजी होत असलेल्या मतदानासाठी 11 मतदान यंत्रांचे सिलिंग करण्यात आले. भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारांच्या उपस्थितीत अवघ्या तासभरातच 11 यंत्रे सिलिंग करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.
भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात बुधवारी सकाळी 10 वाजता प्रभाग 4 व 11 ब मध्ये शनिवारी होत असलेल्या मतदानासाठी लागणारे मतदान यंत्रे (ईव्हीएम) सिलिंग करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील, सहायक अधिकारी राजेंद्र फातले यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सिलिंग करण्यात आली. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी होते. तहसील कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला. मतदान यंत्रे सिलिंग करून गोदामात ठेवण्यात आली. तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान यंत्रे सिलिंग करण्यासाठी पाच टेबल लावण्यात आले व दोन प्रभागांसाठी 11 मशीन सिलिंग करण्यात आले असून दोन मतदान यंत्रे ही राखीव राहणार आहेत.