भुसावळ (प्रतिनिधी ) -: आपल्या भारत देशात युवकांची फार माेठी शक्ती आहे. राष्ट्राच्या कल्याणासाठी त्यांनी श्रमप्रतिष्ठा लक्षात घेऊन काम करणे अपेक्षित आहे, असा सल्ला किन्ही येथील स्थानिक एज्युकेशन साेसायटीचे सचिव संजय नथ्थ चाैधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला. भुसावळ येथील काेटेचा महिला माविद्यालयाचे राष्ट्री सेवा याेजना द्वितीय स्तराचे विशेष निवासी हिवाळी शिबिर किन्ही येथील सर्वाेदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयाेजित करण्यात आले आहे. त्यात उद्घाटन सत्रात ते बाेलत हाेते.

काेटेचा महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ. जीवन धांडे अध्यक्षस्थानी हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून किन्ही येथील स्थानिक एज्युकेशन साेसायटीचे व्हाइस चेअरमन अशाेक येवले, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. वसंत खरे उपस्थित हाेते. प्रा. डाॅ. जीवन धांडे यांनी व्यक्तीमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा याेजनेचे महत्व स्पष्ट केले. उद्घाटन सत्राच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा याेजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्वेता नागला, प्रा. मनाेज कुरकुरे, प्रा. याेगेश काेष्टी, हरिश्चंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, शिबिरात ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, मतदार जागृती, पर्यावरण संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, प्लास्टिक मुक्ती, आराेग्य जनजागृती, सामाजिक प्रबाेधन, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विविध सत्रात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सातदिवस संस्कारमाला
शिबिरात शनिवारी उद्घाटन सत्रात तज्ज्ञांनी संवाद साधला. रविवारी यावल तालुक्यातील पाडळसे येथील पर्यावरणतज्ज्ञ विजय काेळी यांनी ‘हसत खेळत पाणलाेट शिकूया’ या विषयावर संवाद साधला. पाणलाेटचे महत्त्व आणि युवकांची भूमिका, लाेकसहभाग हे मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मांडले. ८ डिसेंबर राेजी जळगाव येथील मानसशास्त्रीय समुपदेशक मुकेश सावकारे हे ‘स्वत:ला समजून घेताना’ हा विषय मांडणार आहेत. ९ डिसेंबरला पालक सहविचार सहभा हाेईल. त्यात पाल्यांशी निकाेप संवाद कसा साधायचा या विषयावर समूह चर्चा हाेईल. १० डिसेंबरला भुसावळच्या याेगप्रशिक्षिका ज्याेत्स्ना पाटील या ‘याेगाभ्यास आराेग्याची गुरुकिल्ली’ हा विषय मांडतील. ११ डिसेंबरला अध्ययन पॅरामेडिकल व काैशल्य विकास महाविद्यालयाचे पथक रक्त, त्वचा, केस व आराेग्य तपासणी शिबिर घेईल.
समाराेप १२ डिसेबंरला होणार
शिबिराचा समाराेप १२ डिसेंबरला सकाळी १० वाजता हाेईल. किन्हीचे उपसरपंच जयंत पाटील प्रमुख पाहुणे असतील. काेटेचा महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ. जीवन धांडे हे अध्यक्षस्थानी असतील. व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा. वसंत खरे यांची उपस्थिती असेल. तत्पूर्वी ११ डिसेंबर राेजी सायंकाळी ७ वाजता शेकाेटी व सांस्कृतिक कार्यक्रम हाेईल. त्यात डाॅ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे संगीत शिक्षक कुंदन तावडे हे सांस्कृतिक विषयावर गप्पा मारतील.


