नाशिक, सप्तश्रृंगी देवीचे दर्शनानंतर परतीच्या प्रवासात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इनोव्हा वाहन गणपती पॉईंटजवळ खोल दरीत कोसळल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार क्रमांक एम.एच.१५ बी.एन.०५५५ ही खाली कोसळली आहे. या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील दोन महिला तीन पुरुष भाविक होते.

गडावर देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घराकडे परतत असताना गणपती पॉईंटजवळ इनोव्हा कारमध्ये बिघाड झाल्याने वा चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतचा संरक्षक कठडा तोडून थेट हजारो फूट खोल दरीत कोसळली.कार मधील पाच ते सहा जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघातग्रस्थांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पण दरी खोल असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती मिळत आहे. खोल दरीत जिथे कार कोसळली आहे तिथे पाच-सहा जण पोहोचलेले दिसत आहेत. त्यांच्याकडून अडकलेली गाडी बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतील अपघाग्रस्तांना जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कारदेखील बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.,
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, गाडी ज्या ठिकाणी पडली आहे, ती दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने मदतकार्य पोहोचवण्यात आणि मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आह
भाविकांच्या वारसाना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल.


