रीलस्टार की चोरस्टार? सोशल मीडियाची ‘बबली’ ठरली चोरट्यांची मास्टरमाइंड; प्रियकरासह अटक

जळगाव / पाथर्डी : सोशल मीडियावर रील्स बनवून लोकप्रिय झालेली आणि तब्बल 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली कोमल नागनाथ काळे (वय 19) ही प्रत्यक्षात सराईत चोरट्यांची मास्टरमाइंड असल्याचे उघडकीस आले आहे. तिच्यासह तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी (वय 25, रा. शेवगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ₹9 लाख 35 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एसटी बसमधील महिला प्रवाशांची लूट19 नोव्हेंबर रोजी अलका मुकुंद पालवे पाथर्डी ते कल्याण एसटी बसने प्रवास करत असताना कोमल काळे हिने त्यांच्या सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने तपास सुरू करून पाथर्डी बसस्थानक परिसरात सापळा रचला आणि कोमलला ताब्यात घेतले.
प्रियकराला दिले होते दागिने; दोन मोबाईल व सोने जप्त
कसून चौकशीनंतर कोमलने चोरी केलेले दागिने आपल्या प्रियकर सुजितला दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुजितला शेवगाव येथून अटक केली.
तपासात धक्कादायक माहिती उघड झाली
चोरीच्या पैशांतून ₹1,70,000 चा आयफोन 17 प्रो मॅक्स रु 15,000 चा ओप्पो मोबाईल
खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी एकूण 6.5 तोळे सोने, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
बस प्रवासी महिलांवरच होती नजर
तपासादरम्यान कोमल व सुजित यांनी अमरापूर–शेवगाव आणि पाथर्डी–भगूर या मार्गांवरील एसटी बसमध्येही चोरी केल्याची कबुली दिली
एकूण 11 गुन्ह्यांमध्ये सहभाग
कोमल काळे हिच्यावर शेवगाव, सुपा आणि शिरूर कासार (बीड) येथे आधीपासून गुन्हे दाखल.
सुजित चौधरी याच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर 8 गुन्हे नोंद.
दोघांवर मिळून एकूण 11 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून ओळखले जाणारे हे कपल प्रत्यक्षात “बंटी-बबली” स्टाइलने राज्यभरात चोरी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, LCB च्या कारवाईमुळे त्यांच्या चोरीच्या मालिकेला ब्रेक बसला आहे.