भुसावळ (प्रतिनिधी ) -: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान पार पाडले जाणार असून सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

मतदान प्रक्रियेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मतदान केंद्रावर मतदारांना एकूण तीन मतपत्रिकांवर मतदान करावे लागणार आहे.
- पहिली मतपत्रिका – नगराध्यक्ष पदासाठी
- दुसरी मतपत्रिका – प्रभागातील ‘अ’ जागेसाठी
- तिसरी मतपत्रिका – प्रभागातील ‘ब’ जागेसाठी
प्रत्येक मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन फक्त एकदाच दाबून मत नोंदवायचे आहे. तिन्ही मतपत्रिकांवर मतदान केल्यानंतर मशीनमधून ‘बीप’ असा आवाज येईल, ज्यावरून मतदान पूर्ण झाल्याची खात्री होईल.
मतदान जनजागृती कक्षामार्फत सर्व मतदारांना विनंती करण्यात येत आहे की, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या मताधिकाराचा सकस वापर करा, असेही आवाहन अधिकारी पाटील यांनी केले.


