सखी श्रावणी महीला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे बालदिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – सखी श्रावणी महीला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे आज जिल्हा परिषद शाळा किन्ही तालुका भुसावळ येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम मुलांशी शिक्षणाबद्दल हितगुज केले .त्यांचे सोबत दिलखुलास गप्पा गोष्टी व गीतगायन करून खेळ खेळले . .. तसेच त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले… दररोज शाळेत यावे.. मिळालेला गृहपाठ पूर्ण करावा .शिक्षणाने आपली प्रगती होते . मुलांशी बोलताना कळले की शाळेत सर्व काही छान शिकवले जात आहे.. मुलांना बरीच माहिती होती .. काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलानी अगदी अचूक दिली… मुलांनी शाळेत शिकवकेल्या कविता छान तालासुरात म्हटल्या व कृतीतून सादर करून दाखवल्या … शाळेत शिक्षक खूप मनापासून शिकवता असल्याचे दिसून आले
लहान मुलांचे हातून केक कापाण्यात आला…
मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.. खाऊ वाटप करण्यात आला ..
यावेळी राजश्री नेवे. माया चौधरी . स्मिता माहूरकर,वंदना झांबरे , हर्षल पाटील, ओंकार पाटील सर दीपाली पाटील, राजेश सुरवाडे हे उपस्थित होते