रावेर लोकसभा अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, शेंदुर्णी (पहूर), भुसावळ, चोपडा व बोदवड तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांना मागणी केली होती. त्यानुसार भारतीय कापूस महामंडळ मार्फत सदर ८ ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करणार आहे. संपूर्ण जळगांव जिल्ह्यात एकूण १५ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रावेर लोकसभा अंतर्गत १० ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांना मागणी केली होती. त्यानुसार रावेर लोकसभा अंतर्गत सध्या ८ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची कळविण्यात आले आहे. बोदवड येथे दि.१०/११/२०२५, जामनेर येथे दि.१२/११/२०२५, भुसावळ येथे दि.१३/११/२०२५ तर मुक्ताईनगर येथे दि.१७/११/२०२५ रोजी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असून, इतर ठिकाणी काही दिवसात सुरवात करण्यात येणार आहे.


