फळाची वृक्षे लावून रक्षा व अस्थि विसर्जन करून शिंदे परिवाराने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश ; पर्यावरण जागर प्रतिष्ठान व टिम हिरवांकुरचे नाना पाटील सरांचा पुढाकार :

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हातील भडगावतील भाजपाचे कार्यकर्ते श्री भगवान शिंदे यांचे बंधु व सागर शिंदे यांचे वडील स्वर्गिय नारायण बाजीराव शिंदे यांचे हृदयविकाराने निधन झाले. यावेळी सागर शिंदे व त्याच्या परिवाराने त्यांच्या वडीलांच्या अस्थी व रक्षा यांचे विसर्जन नदीत न करता अस्थी व रक्षा विसर्जनातून स्मृतीचे फळाचे वृक्ष लावण्याचे शिंदे परिवारातील मोठा मुलगा सागर मुलगी सोनाली जितेंद्र पाटील , जावाई
जितेंद्र गोकुळ पाटील , मुलगी मोनाली किरण पाटील, रूपाली कुणेश बोरसे जावाई कुणेश प्रभाकर बोरसे सोनल सागर शिंदे
भगवान बाजीराव शिंदे नरेंद्र शिंदे विरेंद्र शिंदे अनिल शिंदे ,शांताराम शिंदे संगीता कृष्णा पाटील आदित्य , पुष्कराज , देवांग. देवेश पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे (महाराष्ट्र राज्य) कार्यवाह व टिम हिरवांकूर चेनाना पाटील सर यांनी परंपरेप्रमाणे नदीपात्रात अस्थी व रक्षा विसर्जनाने पर्यावरणाला मोठी हानी पोहचते व नदीचे जल ही प्रदुषित होते, हे शिंदे कुटुंबियास समजल्याने आणि स्वर्गिय नारायण शिंदे हे स्वतः पर्यावरण निसर्ग व वृक्षाचे संवर्धन करणारे होते . त्यामुळे त्यांच्या परिवारानी त्यांच्या स्मृती कायम वृक्षाच्या रूपात कायम स्मृतीत राहतील यासाठी
स्मृतीचे वृक्ष लावलेले आहे ते वृक्ष ही कायम वडीलाची स्मृती जागृत करत असते असे त्यांनी सांगितले त्याच प्रमाणे समाजाने जनतेने ही अस्थी रक्षा विसर्जन हे वृक्ष लावून करावे असे आवाहन जावाई जितेंद्र पाटील शिरपूर यांनी या प्रसंगी केले.

पर्यावरण जागर प्रतिष्ठान चेनाना पाटील सर यांनी या प्रसंगी बहुमोल सहकार्य केले परिवारालाही उपक्रम समजाऊन सांगितला. शिंदे परिवाराने अस्थी व रक्षा विसर्जनातून आईच्या स्मृतीचे फळाची झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण वृक्षसंवर्धन करून या सोबतच जलप्रदूषण टाळले व समाजात एक चांगला संदेश देण्याचा उपक्रम केल्याने पर्यावरण जागर प्रतिष्ठान च्या वतीने नाना पाटील सर यांनी त्यांचे आभार मानले. या वेळी माजी सैनिक उत्तमराव भिका पाटील तांदुळवाडी तसेच श्री आनंदा पाटील सामनेरकर उपस्थित होते यांनीही असे उपक्रम गावागावात सुरू हवेत असे मत व्यक्त केले .