भुसावळ (प्रतिनिधी ) – : भुसावळात ५० जागांवर लढण्याची तयारी सुरू ठेवा. सन्मान जनक जागा मिळाल्यास आघाडी करण्याच्या संदर्भात विचार विनिमय सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू राहील परंतु त्याची वाट न बघता शिवसेना पूर्ण ताकत निशी निष्ठावान शिवसैनिकांच्या मनगटाच्या जोरावर निवडणूक लढेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या बाबतीत निर्णायक भूमिका पार पडेल, असा ठाम विश्वास उपनेते तथा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केला.

भुसावळ येथे सोमवारी रामानंद पॅलेस सभागृहात तालुकास्तरीय मेळावा झाला. त्यात संवाद साधताना ते बोलत होते. गुलाबराव वाघ पुढे म्हणाले की, इतिहास काळातील बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे शिवसेनेची येथील खिंड लढवण्यासाठी नवीन जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. विजयी पताका फडकल्याशिवाय शांत बसू नका. भुसावळ शहर वतीने चंद्रकांत शर्मा यांना चांदीची तलवार भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात दिसले एकीचे बळ
आगामी नगरपालिका निवडणूक संदर्भ जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघांनी शिवसैनिकांना व इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले. या बैठकीत महिला जिल्हाप्रमुख रोहिणीताई पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, तालुकाप्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख गणेश चौधरी, शहरप्रमुख शेख मकबूल शेख फरीद, प्रा. उत्तम सुरवाडे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, बाळा भोई, उमाकांत झांबरे सुनील भोई , पल्लवी जैन, उमाकांत शर्मा (नमा), राकेश ख़रारे, अरुण सालुंखे, शरद जैसवाल, जवाहर गौर, मिलिंद कापड़े, राकेश भोई, समाधान भोई, शेख अब्बास इतर शिवसेनिक उपस्थित होते. मेळाव्यात खऱ्या अर्थाने एकीचे बळ दिसले. सूत्रसंचालन प्रा. उत्तमराव सुरवाडे यांनी केले व आभार उमाकांत शर्मा यांनी केले.


