पुणे : पत्नीचे कुणाशी तरी अफेयर असल्याचा संशय पतीला आल्यानंतर पतीने दृश्यम चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल असे प्लॅनिंग केले. भागड्याने गोदाम घेत तिथे भट्टी बनवली. पत्नीला बाहेर भेळ खाण्याच्या निमित्ताने नेत नंतर तिला गोदामात आणून तिचा गळा आवळला व नंतर मृतदेह भट्टीत टाकून मृतदेहाची राख नदीत टाकण्यात आली. प्रकरण अंगलट येवू नये म्हणून पत्नी हरवल्याची तक्रारही दिली मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करीत आरोपील पतीला बेड्या ठोकल्या. समीर पंजाबराव जाधव असे अटकेतील पतीचे तर अंजली समीर जाधव (38) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

प्रेमसंबंध असल्याचा संशय
आरोपी पती समीर जाधवला आपली पत्नी अंजली हिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता, ज्यामुळे तो सतत तिचा मोबाईल तपासायचा. या संशयामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. अखेरीस यातूनच आरोपीने पत्नीच्या हत्येचा थंड डोक्याने कट रचला. या कटाच्या अंमलबजावणीसाठी त्याने शिंदेवाडी येथे 18 हजार रुपये भाड्याने एक गोदाम घेतले. या गोदामात त्याने आधीच लोखंडी भट्टी तयार करून ठेवली होती आणि लाकडे देखील आणून ठेवली होती. हत्येच्या दिवशी, म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी आरोपीने पत्नी अंजलीला कारमधून फिरायला नेले. नवले ब्रीजमार्गे खेडशिवापूर आणि मरीआई घाट परिसरात फिरवल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदेवाडी येथे थांबून भेळ खाण्याचा बहाणा केला. भेळ खाण्यासाठी गोडाऊनमधील चटईवर दोघे बसले असतानाच त्याने अचानक तिचा गळा आवळून खून केला. यानंतर, त्याने मृतदेह लोखंडी बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळून टाकला, राख ओढ्यात फेकून दिली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तो लोखंडी बॉक्सही भंगारामध्ये विकून


