भुसावळात मतदार यादीत दुबार, मृत नावे कायम :प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीत राजकीय पक्षांची तीव्र नाराजी

भुसावळ (प्रतिनिधी) : मतदार यादीमधील दुबार नावे, मृत मतदारांची नावे कमी करावी, एकाच मतदाराचे आडनाव बदल करीत दोन ठिकाणी नावे आहे, यावर वारंवार हरकती घेतल्यावर सुध्दा निवडणूक विभागाकडून काहीही कारवाई झाली नाही, एकाच घरातील नावे वेगवेगळ्या प्रभागात आली असून हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांची व्यक्त केली. शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात शनिवारी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात पदाधिकारी संताप व्यक्त करीत होते
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, 8 रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, सहाय्यक अधिकारी तथा मुख्याधिकारी राजेंद्र फातले, नायब तहसीलदार संतोष विनंते आदी पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.