रायगडच्या काशिद समुद्र किनाऱ्यात दोन व्यक्तीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. दोन्ही व्यक्ती अकोला जिल्ह्यातील होते. अकोला जिल्हा प्रशासनाकडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक हे फिरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याचे समजतं आहे. त्यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहेत. तर एक विद्यार्थी सुखरूप आहे.
राम कुटे (६०), आयुष रामटेके (१९) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या घटनेत १७ वर्षीय आयुष बोबडे हा विद्यार्थी सुखरुप आहे. सदर घटना मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.
अकोल्यातील एका शिकवणी क्लासेस विद्यार्थी आणि शिक्षकांसह काही सहकार्यांची सहल रायगड जिल्ह्यातील काशीद बीच परिसरात फिरण्यासाठी गेली होती. आज सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास समुद्राकाठी उतरले असता समुद्राच्या लाटेत वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत शिक्षक राम कुटे यांचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याच समजते आहे.


