सुकळी नियतक्षेत्रात चितळीच्या शिकारीपूर्वीच गावठी बंदुकीसह शिकारी जाळ्यात :

भुसावळ (प्रतिनिधी ) : वडोदा वनपरिक्षे9ातील सुकळी नियतक्षेत्रात चितळाची शिकार करण्यासाठी शिकारी आल्याची गोपनीय माहिती वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धाव घेत दोन शिकार्‍यांच्या मुसक्या बांधल्या. अजीज अन्सारी (29) व जलील अहमद (50) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून गावठी बंदूक व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले.
मंगळवारी रात्री 12.20 वाजेच्या सुमारास कक्ष क्रमांक 542, सुकळी नियक्षेत्रात चितळच्या शिकार करण्याच्या प्रयत्नात दोन संशयीत आल्यानंतर वनविभागाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र संशयीत पसार होवू लागताच त्यांचा पाठलाग करून अटक करण्यात आली.


ही कारवाई जळगाव उपवनसंरक्षक राम धोत्रे, सहाय्यक वनसंरक्षक
सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे, डोलारखेडा वनपाल गणेश गवळी, वनरक्षक गोकुळ गोसावी, नवल जाधव, नितीन खंडारे, रजनीकांत चव्हाण, अक्षय मोरे
सुधाकर कोळी आदींच्या पथकाने केली.