भुसावळात महिला पतंजली योग समितीतर्फे ध्वजारोहण उत्साहात संपन्न ;


भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र पूर्व महिला पतंजली योग समिती भुसावळ यांच्या वतीने 79 वा स्वतंत्र दिवस योगिनी योग वर्ग जामनेर रोड भुसावळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य महानंदा पाटील यांच्या मार्ग दर्शनाखाली ,तसेच सर्व पदाधिकारी, योगशिक्षक, व साधक मिळून झेंडावंदन करून राष्ट्रगीत म्हणून व देश भक्ती पर नृत्य सादर करून स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.
मंदाकिनी केदारे, अंजली वाघमारे, राजश्री बादशहा, वर्षा लोखंडे, मीना राजपूत, सुरेखा पाटील, माला चौधरी, हेमा चौधरी, पुनम संकला, यांचे सहकार्य लाभले.