वरणगाव (प्रतिनिधी )- शहरातील महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दी. वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील, उपाध्यक्ष ज्ञानदेव झोपे, सहसचिव प्रदीप भंगाळे, सदस्य संजय कमलाकर चौधरी, गणेश बढे, सुरेश पाटील, प्रशांत झोपे, सुनील बऱ्हाटे, बापू चौधरी, गोविंदा माळी, विक्रम देशमुख, राजेंद्र चौधरी, संजय पुरुषोत्तम चौधरी, रमेश चौधरी, प्राचार्य चंद्रशेखर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात राष्ट्रीय छात्र सेना (NCC), स्काऊट-गाईड आणि RSP विद्यार्थी गणवेशात हजर होते. कार्यक्रमानंतर NCC ऑफिसर सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. बँड पथकाच्या वाद्यात ही प्रभात फेरी बस स्थानक चौक, रावजीबुवा,नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा, तिरंगा सर्कल मार्गे फिरून महात्मा गांधी विद्यालयाच्या आवारात विसर्जित झाली.
यावेळी तंबाखूमुक्त विषयावरती प्रतिज्ञा घेतली तसेच विद्यार्थ्यांनी कवायती सादर करून स्वातंत्र्य दिन साजरा केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. बी. खर्चे यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




