भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या औचित्याने विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ येथील विभागीय रेल्वे कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले आणि उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहणानंतर, पुनीत अग्रवाल यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (मुंबई) यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्तचा संदेश वाचून दाखवला. यामध्ये मध्य रेल्वेने जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत केलेल्या कामगिरीची कार्यांची माहिती देण्यात आली.
यावेळी विभागीय व्यवस्थापकांनी सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीय तसेच रेल्वे ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रेल्वे सुरक्षा बल तुकडी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमा मधे मानवंदना देत परेड प्रस्तुत केली त्यांचा सोबत स्काउट गाइड, सिविल डिफेंस आणी रेल्वे शाळेमधील विद्यार्थ्यांनी सुद्ध्या परेडमधे सहभाग घेतला. त्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या हस्ते महिला कर्मच्या-यांना हर घर तिरंगा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी प्रतियोगिता मधे उत्कृष्ट रांगोळ्यांबद्दल पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वे शाळेमधील विद्यार्थ्यांनी, त्यांचा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुन्दर नृत्य सादर केले तसेच सांस्कृतिक विभागातील रेल्वे कर्मचा-यानी सुद्धा सुंदर देशभक्ती गीते सादर केलीत.
स्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमास मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन भुसावल च्या अध्यक्षा श्रीमती. रेखा अग्रवाल आणि इतर कार्यकारिणी सदस्या, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनिल कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीना, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ शाखाधिकारी, रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.



