ताप्ती पब्लीकस्कुल मध्ये गुरु पोर्णिमा उत्साहात संपन्न ;

भुसावळ, (प्रतिनिधी ) – शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपोर्णिमे निमीत्त विद्यार्थ्यांनी विविध नाटिका सादर केल्या . .दरवर्षी आषाढी पौर्णिमेनिमित्त स्कुल मध्ये गुरु पोर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाची सुरुवात प्रिंसीपल निना कटलर यांनी सरस्वती पूजन व द्वीप प्रज्वलाने केली . त्यांनी विद्यार्थ्यांना गुरु या नावाचा अर्थ सांगून गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधाकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतात असे सांगितले.विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील आई, वडील,शिक्षक या सर्व गुरूंचे महत्व पटवून दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यां बद्दल सांगून गुरुंबद्दलचा आदर व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त नाटिका सादर करताना विद्यार्थी सोबत उपस्थित प्रिन्सिपल निना कटलर.