भुसावळ (प्रतिनिधी ) – गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चार गोमाताना वाचवून भुसावळातील गोसेवकांनी गुरु एकबोटे यांना आनंदी भेट देत गुरुपोर्णिमा साजरी केली

कुठेही गोमाता संकटात असो कि जखमी अवस्थेत गोसेवक भक्त परिवार क्षणार्धांत पोहचत असंख्य गोमाता गोवंश वाचविण्याचे कार्य पुर्ण तत्वावर करत यशस्वी वाटचाल करीत आहेत भुसावळ तालुक्यातील महादेव माळा जवळील गावात रवी पवार यांच्याकडे असलेल्या गोमातेसाठी गैरवृत्ती असलेले नाना प्रकारची लोक सदर गोमाता आम्हाला पैश्यांनी द्यावी अशी जबरदस्ती गळ घालु लागली होती
म्हणून पवार परिवाराने ठरविले चुकीच्या हातात गोमाता नाही देणार त्यांनी गावातील रहिवाशी जाधव परिवाराशी संपर्क केला व त्यांनी गोरक्षक रोहित महाले यांना सर्व वृत्तांत सांगितला तसेच गोमाता घेऊन जाण्याबद्दल सांगितले . त्यानुसार गोमाता सेवा केंद्रात काही वेळात पवार यांच्या घरी जावून सुखरुप चार गोमाता सुरक्षीतपणे गोमाता सेवा केंद्रात आणली व त्यांचे संगोपनाची काळजी घेतली प्रसंगी वाहन खर्च योगेश वासुदेव पाटील गणेश अरुण चौधरी यांनी केला तर गोसेवेचे कार्य बल्लु धायडे कुणाल शिंदे अनिकेत पाटील साहिल पाटील रोहित महाले यांनी परिश्रम घेतले अश्या प्रकारे गोसेवक रोहित महाले व सहकरी यांनी गोमातेना सुखरूप वाचविले समस्त हिंदू आघाडीचे गुरुवर्य मिलिंदजी एकबोटे यांनात्यांच्या शिकवणीवर चालत सेवारूपी गुरुदक्षिणा दिली .
आपल्या भागातील गोभक्तांनी आसपास परिसरितील नागरिकांना विनंती आहे की, आपली गोमाता गोवंश शेवटच्या श्वासापर्यंत घरीच ठेवावी किंवा गोशाळेत द्यावे कदापीही चुकीच्या हातात देऊ नये धरणी मातेवरील साक्षात 33 कोटी देवगोमातेच्या उदरात आहेत तरी गोमातेचार सांभाळ करा . असे आवाहन गोरक्षक रोहित महाले यांनी केले अश्या प्रकारे गोसेवक रोहित महाले व सहकरी यांनी गोमातेना सुखरूप वाचवून समस्त हिंदू आघाडीचे गुरुवर्य मिलिंदजी एकबोटे यांना त्यांच्या शिकवणीवर चालत सेवारूपी गुरुदक्षिणा दिली .


