भुसावळ (प्रतिनिधी ) – आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसावलेले जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातीलवारकरी , श्री विठ्ठल भक्त , भाविक यांच्या साठी आज ५ जुलै रोजी मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशन येऊन अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर ला रवाना झाली.


केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सदर गाडीची मागणी केली होती. त्यानुसार भुसावळ रेल्वे स्टेशन येथून दि.5 रोजी दु.01.30 वा पंढरपूरसाठी निघणाऱ्या गाडीस आज रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीस रवाना केले.
सदर “विशेष आषाढी रेल्वे” गाडी उद्या दि.6 रोजी पहाटे 3.30 वा. पंढरपूर येथे पोहोचणार तर उद्याच रात्री 09.00 वा पंढरपूर येथून परतीला निघणार असुन, दि.7 रोजी भुसावळ येथे परत येणार आहे.

सदर अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडीचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून, सदर सुविधा वारकऱ्यांसाठी मोफत आहे, यावेळी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांशी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री .संजय सावकारे यांच्यासह रेल्वे भुसावळ मंडळ व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जिल्हाधिकारी . आयुष प्रसाद तसेच महायुती व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत उपस्थित होते.



