जनजाती बांधवांना घरकुल बांधून मिळावे यासह अन्य मागणी साठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याच्यावतीने गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – जनजाती बांधवांना गावठाण व गायरान जागेचे नमुना ८ चे उतारे मिळुन त्यावर घरकुल बांधून मिळावे यासाठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याचे वतीने मागणी करण्यात आली असून याबाबत मागणी निवेदन दि ४ जुलै २०२५ रोजी यावल येथील सहाय्यक गट विकास अधिकारी श्री पवार यांना देण्यात आले

यावल तालुक्यातील जवळपास २७ पाडेवस्ती चां यात समावेश आहे श्री पवार यांनी अर्जाचा विचार करून लवकर सर्वं ठिकाण चां सर्व्हे करुन शक्य तिथे घरकुल बांधून दिले जातील असे आश्वासन दिले व देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ टिमचे गरज भासल्यास सहकार्य घेवु असे सांगितले यावेळी चर्चा करतांना व अर्ज देतांना जिल्हा महिला प्रमुख ॲड चित्रा आचार्य, जिल्हा सहकोषाध्य्क्ष ॲड जयश्री देशमुख, महिला सह प्रमुख ॲड जास्वंदी भंडारी, श्री मुकुंद प्रचंड व विरसिंग वसावे उपस्थित होते