राम बायोटेक आणि भुसावळ पु. ओं. नाहाटा महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

भुसावळ (प्रतिनिधी ) – शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवणारी आपल्या परिक्षेत्रात नावाजलेली राम बायोटेक आणि भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय सामंजस्य करार (MOU) करण्यात आला करार करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पुष्कराज चौधरी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, इनक्यूबॅशन हेड, डॉ. उमेश फेगडे आणि डॉ. सचिन कोलते.उपस्थित होते

राम बायोटेक” (Ram Biotech) ही कंपनी जीवशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा (biotechnology) वापर करून वनस्पतींच्या ऊतक (tissue culture) आणि व्हेजिटेबल नर्सरी याविषयी उत्पादकता वाढवण्यासाठी अग्रमानांकित आहे.
या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे जमिनीची उत्पादक क्षमता वाढवून शेतकीय (केळ, पपई टरबूज) उत्पादनासंबंधी माहिती मिळेल.
हा सामंजस्य कराराबाबत संपूर्ण व्यवस्थापक मंडळ, प्राचार्य आणि उप प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले.