जळगावमध्ये दिव्यांग बांधवांसाठी ‘जयपूर फुट कॅलिपर्स’ मोफत वाटप शिबिराचे आयोजन ; ११ जून २०२५ रोजी मोजमाप शिबिराचे उद्घाटन, मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उपक्रमास प्रारंभ

जळगाव (प्रतिनिधी ) –
दिव्यांग बांधवांसाठी एक दिलासादायक उपक्रम म्हणून रेड स्वस्तिक सोसायटी, लायन्स क्लब मुंबई महानगर, आणि भगवान महावीर विकलांग समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व आनंदाश्रम सेवा संस्था यांच्या सहकार्याने दिनांक ११ ते १३ जून २०२५ दरम्यान मोफत जयपूर फुट, कॅलिपर्स, क्रचेस, हिअरिंग एड्स व अन्य सहाय्यक उपकरणांचे वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील मोजमाप शिबिराचे उद्घाटन दिनांक ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, सरदार वल्लभभाई पटेल हॉल, जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील, जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीषभाऊ महाजन, खासदार सौ. स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, तसेच रेड स्वस्तिकचे सहमहाव्यवस्थापक अशोक शिंदे, लायन्स क्लबचे गव्हर्नर विराफ मिस्त्री, सुरेशजी जैन, निखिल पारिख, फिरोज कात्रक, गिरीष सिसोदिया, अनिकेत पाटील (पिपल्स बँक, जळगाव), दिलीपजी परमार, मोतीलाल पुनामिया, भगवान महावीर विकलांग समितीचे श्री. व्यासजी, अॅड. राजेश झाल्टे (रेड स्वस्तिक चेअरमन), कार्यकारी अध्यक्ष जे. बी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या शिबिराचा उत्तर महाराष्ट्रातील तसेच जळगाव जिल्ह्यातील गरजू दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख सत्यनारायण खटोड, जिल्हा समन्वयक डॉ. धनंजय बेंद्रे, दिलीप गवळी, डॉ. गणेश पाटील, महिला शाखा अध्यक्षा सौ. मनिषा पाटील, नरेश चौधरी, दिपक पाटील, नंदु रायगडे, यश पांडे, शरद पांडे, नितीन बापट, शेखर दादा पाटील, डॉ. प्रमोद आमोदकर, नवनीत पटेल, मंजुषा अडावदकर, निता वानखेडकर, आणि प्रकल्प संचालक राहुल सूर्यवंशी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

रेड स्वस्तिक परिवार, नारीशक्ती संस्था, तसेच आनंदाश्रम सेवा संस्था यांच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक प्रभावी व व्यापक रूपात राबवण्यात येणार आहे.