वरणगाव शहर शांतता प्रिय मात्र, उपद्रवींचा बंदोबस्त करणार- नवनिर्वाचीत एपीआय अमितकुमार बागुल यांचा मनोदय

वरणगाव । प्रतिनिधी

वरणगाव शहर हे शांतता प्रिय शहर आहे मात्र, काही उपद्रवींमुळे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अशा उपद्रवींचा बंदोबस्त केला जाईल . तसेच शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावली जाईल असा मनोदय नविन एपीआय अमितकुमार बागुल यांनी व्यक्त केला .

वरणगाव पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजु झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांची वरणगांव शहर पत्रकार संस्थेचे विजय वाघ, विनोद सुरवाडे, सुरेश महाले, अजय जयस्वाल, बाळासाहेब चव्हाण, राजु खडसे, किरण कोलते व इतर सभासदांनी सदीच्छा भेट घेतली . यावेळी औनपचारीक मनमोकळेपणाने चर्चा करतांना सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी वरणगाव शहर हे शांतता प्रिय शहर असून काही उपद्रवी शहरातील शातंता भंग करण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त करण्यात येईल . सद्यस्थितीत प्रथम सर्व उपद्रवींचा आढावा घेतला जाईल तसेच शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे व बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्या वाहन धारकांना रडार वर घेतले जाणार असुन पालकांनी आपल्या अल्पवयीन बालकांच्या हाती कुठल्याही प्रकारची वाहने देऊ नये . इतकेच नव्हेतर शहरातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदैव प्रयत्नशिल राहणार असुन पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन कुणावरही अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल . तसेच अन्यायग्रस्त नागरीकांनी निसंकोचपणे माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . नव्यानेच रुजु झालेले अमितकुमार बागुल यांनी आतापर्यंत राज्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्य केले असुन ते एसआरपी मध्ये सुध्दा कार्यरत होते . तसेच त्यांनी भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातही आपले कर्तव्य बजावले असुन त्यांना अनेक गोष्टींचा अनुभव असल्याने त्यांच्याकडे वरणगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे . मात्र, ते वरणगाव शहराचा कारभार कशा पद्धतीने यशस्वीरीत्या सांभाळतात याकडेही काही राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे . तर सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी सांयकाळी आपल्या काही सहकारी बांधवासह शहराच्या मुख्य भागात पायी फिरून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .