नाशिकरोड : गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाचे पोनि. नितीन भामरे यांना दि.11 मे 2025 रोजी खात्रीलायक बातमी मिळाली होती की, शनी मंदिर पंचक, जेलरोड या ठिकाणी एक सशंयीत पिस्टल लावुन परिसरात फिरत आहे. मिळालेली माहिती नाशिकरोड वपोनि. अशोक गिरी यांना देताच त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार नाशिकरोड गुन्हेशोध पथकाचे सपोनि श्री. प्रविण सुर्यवंशी व पोउनि संदिप पवार व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी पथक तयार करून शनी मंदिरा जवळ, पंचक या ठिकाणी जावून संशयिताचा शोध घेतला असता तो दिसताच त्याचे नाव विचारले त्याने आसीक अंसार कुरेशी (वय-26) रा. नांदुर नाका, निमसे मळा, कमळवाडी, नाशिक असे सांगितले त्याच्याजवळून 25 हजार रूपये किंमतीचे एक गावठी कट्टा व पाचशे रूपये किंमतीचे 1 जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरूध्द फिर्याद दिल्यामुळे नाशिकरोड पोलीस ठाणे गुरनं 254/2025 भा.ह.का कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोह. विजय टेमगर हे करीत आहेत.
तसेच नाशिकरोड विहीतगांव येथे राहणारे व व्यवसायिक वाहन चालक अशोक हिरामन बागुल (वय-61) रा. बागुल नगर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, यांचेकडे काही सराईत गुन्हेगारांनी हफ्ता मागितला असता तो न दिल्याने याचा राग आल्याने यांच्या घराच्या दि.12 मे 2025 रोजी, मध्यरात्री 2 वाजता खिडकींच्या काचा फोडल्या, प्लास्टीकचे ड्रम फोडुन, घराच्या दरवाज्यावर कोयते मारून दरवाजा तोडला व परिसरात दहशत निर्माण केली. यावरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुरनं 253/2025 भा.न्या.सं.कलम 308(4), 352, 351(2), 115(2), 3(5) सह.भा.ह.का 4/25 सह क्रिमीनल अॅबेटमेंट अॅक्ट 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला.
तक्रारीच्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस गुन्हेशोध पथकाने तात्काळ घटनास्थळी जावुन सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील 3 सराईत व इतर 1)राहुल उर्फ भांडया तेलोरे, रा. बागुल नगर, विहीतगांव 2)अनिकेत उर्फ केरला राजु जॉन, रा. भारती मठ, सुभाष रोड, नाशिकरोड 3) समीर शेख, रा. विजय नगर, जयभवानी रोड 4)यश दंडगव्हाळ, रा. जेलरोड या आरोपीतांना अटक केली. व त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.16 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि. संदिप पवार हे करीत आहे.
या दोन्ही गुन्ह्यांची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोउपआयुक्त परिमंडळ-2 श्रीमती मोनिका राऊत व सहा.पोआयु. नाशिकरोड विभाग डॉ.सचिन बारी, यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वपोनि. अशोक गिरी, पोनि. बडेसाब नाईकवाडे, पोनि. विश्वजीत जगताप, गुन्हेशोध पथक सपोनि. प्रविण सुर्यवंशी, पोउनि. संदिप पवार, पोह. अविनाश देवरे, पोह. विजय टेमगर, पोशि. नितीन भामरे, नाना पानसरे, अजय देशमुख, विशाल कुवर यांनी संयुक्तरित्या मिळून केली.