भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील घुले दाम्पत्य यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल , पार्टी मनोरंजन न करता समाजपयोगी असा स्तुत्य उपक्रम राबवत शालेय विद्यार्थ्याना शालेयपयोगी साहित्य व खाऊ वाटप करून एक आदर्श घडवला आहे

चिरंजीव रितेश रामधन घुले याच्या 28 व्या वाढदिवसानिमित्त सुनीता घुले आणि रामधन घुले यांनी
आपल्या मुलाचा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. विकास विद्यालय जळगाव खुर्द येथे शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे आणि खाऊचे वाटप केले. मुलांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना काय आवश्यक आहे हे जाणून घेऊन त्यांच्यासाठी लेटर पॅड ची देखील व्यवस्था करून दिली.
यावेळी विकास विद्यालय जळगाव चे चेअरमन भगवानदादा विठ्ठल महाजन यावेळी उपस्थित होते तसेच ए. जे .नारखेडे सर मुख्याध्यापक सी .पी .पाटील सर, वाय के पाटील , एस. आर .पाटील व्ही. जी .सपकाळे , एस. एस. पाटील , ए. जे.सपकाळे मॅडम आणि सर्व शिक्षक स्टॉप उपस्थित होता. तसेच मंदाकिनी केदारे ,सुनिता तायडे, वैशाली सावकारे, रेखा तायडे ,सारिका पाटील ,अलका सपकाळे, यांची उपस्थिती होती.प्रसंगी मुलांच्या आणि मुलींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.
j


