भगवान परशुराम जन्माेत्सवानिमित्त रॅली उत्साहात;१ मे राेजी भंडारा

भुसावळ (प्रतिनिधी ) : येथिल तापी नदीवरील टाेल नाक्याजवळील भगवान परशुराम मंदिर देवस्थान तसेच सकल ब्राम्हण समाजा तर्फे अक्षय तृतिया तथा परशुराम जन्माेत्सवानिमित्त रविवारी जामनेर राेडवरील श्री साईबाबा मंदिर ते भगवान परशुराम मंदिर माेटरसायकल रॅली सायं. ५ ते ६ दरम्यान काढण्यात आली असता बहुसंख्य भाविकांनी सहभाग घेतला हाेता.
दरम्यान आज साेमवारी स.८ ते १२ शांतीपाठ, तर दि. २९ राेजी संध्या. ४ ते ६ श्री परशुराम जन्माचे किर्तन ह.भ.प. श्री देवेंद्र जाेशी हे सादर करतील.१ मे रोजी सकाळी १० ते २ पर्यंत भंडारा तथा महाप्रसादाचे आयाेजन केलेले आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा.
दरम्यान महाप्रसादासाठी काही साहित्य अथवा देणगी द्यावयाची असल्यास त्यांनी १ मे पर्यंत तापी पूल ताेल नाक्याजवळील भगवान परशुराम मंदिर देवस्थान पदाधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.