भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार एकनाथराव खडसे यांचा तीव्र निषेध ; खडसेंनी माफी मागावी – मागणीचे यावल तहसीलदार यांना दिले निवेदन ;

यावल . भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या बद्दल आमदार एकनाथराव खडसे यांनी कुठलेच पुरावे नसताना राजकीय हव्याशा पोटी अश्लील भाषेत वक्तव्य केले हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असा तीव्र निषेध व्यक्त करीत भाजपा तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकार यांना लेखी निवेदन दिले.
भारतीय जनता पार्टीचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे बिनविरोध निवडून आलेले चेअरमन पांडुरंग दगडू सराफ,व्हाईस चेअरमन अतुल भागवत भालेराव,माजी चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे, संचालक तेजस धनंजय पाटील यांनी मंगळवार दि.८ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या बद्दल कुठल्याच पुरावे नसताना राजकीय व्यावसायकोटी आमदार एकनाथराव खडसे यांनी ज्या अश्लील भाषेत वक्तव्य केले ते अतिशय निंदणीय आहे त्यामुळे सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावले आहेत बेताल वक्तव्य बंद करून आमच्या नेत्यांची माफी मागावी अन्यथा भाजपातर्फे आंदोलन करू असे दिलेल्या निवेदनात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे. . निवेदन देताना यावल तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.