भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील लेण्यांमध्ये असलेले चित्रांच्या सर्वप्रथम प्रतिकृती साकारणारे प्रसिद्ध चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांना भुसावळ येथे त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 10 एप्रिल रोजी सामुदायिक आदरांजली अर्पण करण्यात आली. शहरातील आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन या कला प्रकारात कार्य करणाऱ्या संस्थे च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन मागिल काही वर्षांपासून करण्यात येत आहे. रेल्वे इस्पितळ च्या समोरील दफनभूमीत मेजर रॉबर्ट गिल यांची समाधी आहे. या वेळी आयोजित कार्यक्रमात सेंट पॉल ख्रिश्चन सेमीट्री चे अध्यक्ष रेव्हरंट किशोर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने सामुदायिक प्रार्थना आणि आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य अतुल मालखेडे , प्रमुख पाहुणे, साप्तपुट ललित क्लभवन ,खिरोदा प्रमुख अतिथी उपस्थिती लाभली. सकाळी 8 वाजता झालेल्या कार्यक्रमात भारतातील प्रसिद्ध लेखिका तसेच रॉबर्ट गिल यांचे अभ्यासक डॉ. प्रमिला शर्मा, सोलापूर तसेच प्रसिद्ध लेखक प्रफुल्ल पळसुलेदेसाई यांची विशेष उपस्थिती होती.,तसेच डॉ .प्रमिला वर्मा, प्रफुल्ल पळसुले देसाई यांना सन्मान पत्र ,स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला त्यांनी गिल यांच्या कार्यावर प्रकाश टाकतांना आपले मनोगत व्यक्त केले. डॉ प्रमिला वर्मा यांनी “रॉबर्ट गिल और अजिंठा की पारो” लिखित पुस्तकाचे अनुभव सांगितले तसेच रॉबर्ट गिल साहेब यांच्या समाधीवर ” रॉबर्ट गिल और अजिंठा की पारो” हे पुस्तक ठेवून श्रद्धांजली वाहिली . व्हील चेअर असलेली आणि अर्थ शरीर अपंग असलेल्या राशीने अजिंठा लेणीतील प्रसिद्ध भित्ती चित्र पद्मपाणी चित्र ओठामधे ब्रश घेऊन अप्रतिम असे चित्र रेखाटले .आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन चे संस्थापक राजेंद्र जावळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. या वेळी राजेंद्र जावळे, शाम कुमावत, नशिराबाद,,पंकज
नागपुरे,चोपडा,श्रीकांत पवार, विकास चौधरी, राशी प्रवीण पाटील,गिरीश लक्षवाणी,खिरोदा, प्रियांका कोळी, खिरोदा, अनिलराज पाटील, चोपडा, मनोहर झांबरे, वराडसिम , रविराज पाटील , चोपडा, पुष्कर पाटील, खिरोदा, दिगंबर खैरनार, प्रियांका कोळी,या कलावंत व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे वेळी अजंठा विषयावर चित्र साकारून आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करीत मेजर रॉबर्ट गिल यांच्या कार्याचा गौरव केला. सर्व सन्माननीय चित्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी तर आभार राजेंद्र जावळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ,रमाकांत भालेराव,श्रीकांत पवार,
यांनी परिश्रम घेतले.



