भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल मरिमाता मंदीराजवळील भिल्ल वस्तीवर देवगिरी प्रांतच्या माध्यमातून कल्याण आश्रम अंतर्गत वीर एकलव्य बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन दिनांक ११ एप्रिल रोजी क्षेत्रिय महिला प्रमुख वैशाली ताई देशपांडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी नंदुरबार येथील देवगिरी प्रांताच्या सौ मीनाताई वळवी यासुद्धा उपस्थित होत्या.
जिल्हा शिक्षा आयाम प्रमुख ऍड मंजुषा देशमुख यांच्या नेतृत्वात नगर ग्राम वनवासी हम सब भारतवासी या उक्तीप्रमाणे वीर एकलव्य बाल संस्कार केंद्र , भुसावळयेथे या पहिल्या बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी पुणे येथील क्षत्रीय महिला प्रमुख सौ वैशाली ताई देशपांडे यांचे हस्ते फलक पूजन करण्यात आले . प्रसंगी वैशाली ताई यांनी उपस्थित लहान मुलां मुलींना संस्कारात्मक उपदेश देवून विविध धार्मिक कथा गोष्टी रुपात सांगीतल्या . मुलांना बिस्किट्स चॉकलेट व खाऊ वाटप करण्यात आला .देशपांडे मॅडम यांच्या नेतृत्वात जिल्हा समितीच्या ऍड चित्रा आचार्या , ऍड. जास्वंदी भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षा आयाम प्रमुख ऍड मंजुषा कुलकर्णी यांनी पहिली बालसंस्कार वर्गाची स्थापना केली . जिल्ह्यात तालुक्यात पाड्यांवर गाव शहरासह विवीध भागात बालसंस्कार वर्गाची स्थापना करणार असल्याचे ऍड मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले
कार्यक्रमास मिना ताई वसावे ,यांचेसह उज्वला बागुल अनिता ठाकरे , स्वाती भोळे विजया निकम , मंगला पाटील , यांचेसह महिलांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक आभार ऍड जास्वंदी भंडारी यांनी केले .



