भुसावळ(प्रतीनिधी ) – येथील श्री योगेश वासुदेव पाटील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांनी मागील तीन वर्षापासून बेवारस निराधार मृतदेहाची भुसावळ तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे 170 मृतदेहांचे अंत्यसंस्कार स्वखर्चाने केल्याने,तसेच भुसावळ तालुक्यामध्ये शहरातील काही तरुणांच्या सहकार्याने आपल्या स्वखर्चाने गोसेवा केली म्हणजेच गाईंचे इलाज करणे,व संगोपन करणे असे कार्य गेल्या दोन वर्षापासून करत असल्याने वरील दोन्ही कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सेवाभारती जळगाव,देवगिरी प्रांत या संस्थेतर्फे त्यांचा समारंभ पूर्वक सत्कार करण्यात आला. श्री योगेश पाटील यांचा माननीय अँड.नारायणजी लाठी(ज्येष्ठ विधीज्ञ,जळगाव),आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री मा.परागजी कंगले यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी सेवाभारती जिल्हाध्यक्ष श्री मनीषजी काबरा, जिल्हा सचिव सेवा भारती संदीपजी कासार यांची विशेष उपस्थिती होती



