रावेर प्रतिनिधी ;- विजेचा शॉक लागून मंत्रालयातील सेवानिवृत्त आरोग्य अव्वल सचिव जमशेर समशेर तडवी (वय ६२, रा. कुसुंबा खुर्द) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

ही दुर्घटना काल सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली. ते घराच्या समोरील व्हरांड्यात उभे असताना लोखंडी अँगलला स्पर्श झाला, त्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि ते खाली कोसळले.
त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती राजू गुलशेर तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


