भुसावळ (प्रतिनिधी ) –

8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज अहिल्यादेवी कन्या विद्यालयांमध्ये महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या प्रमुख बी के कविता दीदी, कुसुम माता, प्रभाकर भंगाळे, रितेश जी वाघोदे आदी मान्यवर उपस्थित होते…
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कविता दीदी यांनी.. नारी तू शक्ती है या विषयावर अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायक असे मनोगत व्यक्त करतांना महिलांनी विरोधी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे .प्राचीन काळातील महिलांनी केलेली भारतीय संस्कृती जतन आजही महिलांनी सुरू ठेवले आहे. आपल्याला काय बनायचे तसे संस्कार होणे आवश्यक आहे. या साठी मेडीटेशन अर्थात धारणे वर लक्ष केंद्रित करा असे त्यांनी मनोगतात सांगितले .
तसेच ज्येष्ठ शिक्षक यांनी त्या त्या काळात त्या त्या स्त्रीयांनी संस्कार क्षम गोष्टी आपल्या मुलाबाळांना कथन केल्या व त्यानुसार घडविण्याचा प्रयत्न केला म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज , महाराणा प्रताप असे महापुरुष निर्माण झाले . तसे आजच्या काळातील समस्या ओळखून त्या मांडल्या गेल्या पाहिजेत तसेच त्यांनी आजच्या काळातील काही स्त्रीया विषय त्यांनी केलेले कार्याविषयी माहिती दिली
प्राचीन काळातील तर आताच्या काळातील काही स्त्रियाची ओळख करून श्री नाना पाटील सर यांनी महिला सक्षमीकरण याविषयी मनोगत व्यक्त केले.. तदनंतर आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी मधून वैभवी चौधरी, दिव्या महाले, वेदिका देसाई ,श्रेया पाटील, भाग्यश्री सोनवणे, समृद्धी चतुर ,हेमांगी पाटील या विद्यार्थिनींनी बॉक्सिंग व कराटे या खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले.. विद्यालयातील शिक्षिका सौ कोमल जोशी टीचर यांनी शिक्षण संक्रमान मधील प्रसिद्ध झालेला महिला सशक्तिकरण याविषयीच्या लेखाचे वाचन केले
सर्व शिक्षक बंधु भगणी यांना महिला दिनाच्या निमित्ताने पेन व पुस्तक भेट देण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत देवरे सर यांनी केले .


