शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी– डॉ. शंकर साळुंके


भुसावळ, (प्रतिनिधी)– नव शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना विद्यार्थ्यांची क्षमता वाढवावी लागणार असून शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील विविध क्षमता वाढीस लागण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन तालुकास्तरावरील सुलभक तथा मार्गदर्शक डॉ. शंकर साळुंके (उपशिक्षक पंडित नेहरू विद्यालय वराडसिम) यांनी केले. यावेळी प.क.कोटेच्या माध्य. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता राणे व प्राथ. मुख्याध्यापिका पुष्पा दाणी उपस्थित होत्या. गटसाधन केंद्राच्या वतीने त्यांचे स्वागत संजय गायकवाड यांनी केले.
भुसावळ येथील प.क.कोटेच्या विद्यालयात दिनांक 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सुरू आहे त्यात तालुक्यातून 150 माध्यमिक शिक्षक सहभागी झाले आहेत. शहरातील पुंडलिक बराटे विद्यालयात तालुक्यातील प्राथमिक विभागाचे 150 शिक्षक सहभागी झाले असून तालुक्यात सुमारे एकूण 300 शिक्षक पहिल्या टप्प्यात सहभागी झाले आहेत.
तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणासाठी शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान ,बी डी धाडी, समन्वयक सचिन पाटील, संजय गायकवाड, सुलभक तथा मार्गदर्शक डॉ. शंकर साळुंके, जी जी राजपूत, सचिन माळी, बी एस भंडारी, एस आर सपकाळे, योगेश गांधेले, चिपळूणकर सर, नितीन पाटील, देवरे सर हे प्रयत्नशील असून पाच दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात व त्या चर्चेला येणाऱ्या विषयांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले.


पाच दिवसात या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, क्षमता आधारित मूल्यांकन, क्षमताधिष्ठ प्रश्न निर्मिती, नवीन आव्हाने पेरणारे शिक्षण ,भारतीय ज्ञान प्रणाली, व्यावसायिक शिक्षण, समग्र प्रगती पत्र आणि शिकण्याला प्राधान्य या विषयावर मंथन केले जात आहे.
–चौकट– व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 निश्चितच उपयोगी ठरेल सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षक निश्चित प्रत्यक्ष वर्गामध्ये प्राप्त नवीन ज्ञानाच्या आणि कौशल्यांचा उपयोग करतील. ज्यायोगे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंची होण्यास मदत होईल– गिरीश एस नेमाडे. उपशिक्षक, पं.ने. विद्यालय वराडसीम तथा जिल्हाध्यक्ष, म. रा. माध्यमिक शिक्षक परिषद.