जळगाव एमआयडीसी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : अट्टल चोरटे दोन दुचाकींसह जाळ्यात :दोन गुन्हे उघडकीस :


जळगाव (प्रतिनिधी ) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकत दोन गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये आकाश सुरेश शिंदे (19, रा. साईनगर, कुसूंबा, ता.जळगाव) व सुरज मुनेंद्र द्विवेदी (22, रा. सेक्टर डी, साईमत ऑफिसजवळ, जळगाव) या आरोपींआ अटक केली आहे

एम आय डी सी पोस्टेचे मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड

एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस गुरनं. 67/2025 बिएनएस कलम-303[2] प्रमाणे दिनांक 01.02.2025 रोजी 19.13 वाजता मोटारसायकल चोरी बाबत गुन्हा दाखल असुन सदर गुन्हांतील फिर्यादी सिध्दार्थ दिपक शर्मा वय-23 रा. बालाजी मंदीर जवळ जळगाव यांची दिनांक 29.01.2025 रोजी रात्री 12.30 वाजेच्या दरम्यान 25,000/- रु किनी बजाज प्ल्सर कंपनीची मोटारसायकल चोरी केले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हांत मा. पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन दिनांक 17.02.2025 रोजी 01.00 वाजता आरोपी आकाश सुरेश शिंदे वय 19 रा.साईनगर कुंसुबा ता जि जळगाव यांचे कडुन चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

एम आय डी सी पोस्टे एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस गुरनं. 846/2024 बिएनएस कलम-303[2] प्रमाणे दिनांक 22.11.2024 रोजी 15.33 वाजता मोटारसायकल चोरी बाबत गुन्हा दाखल असुन सदर गुन्हांतील साईरस महेश बोंडे वय 28, धंदा प्रिंटींगप्रेस रा. 13 किसनराव नगर गिरणा पंपीग रोड, रामानंद नगर जळगाव यांची दिनांक 14.11.2024 रोजी 09.30 वा ते 11.30 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रॉयल टूर्फ येथुन सार्वजागी 35,000/- रु कि ची हॉण्डा कपंनीची ड्रिमयुगा मोटारसायकल चोरी बाबत गुन्हा दाखल असुन सदर गुन्हांत मा. पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन दिनांक 19.02.2025 रोजी 20.49 वाजता आरोपी सुरज मुनेंद्र दिवेदी वय-22 रा. सेकटर डी, साईमत ऑफीस जवळ जळगाव यांचे कडुन चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

या पथकाने केली कारवाई

सदरची कार्यवाही .पोलीस अधिक्षक श्री डॉ. महेश्वर रेड्डी., जळगाव व अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते सो., तसेच मा. उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित ., जळगाव मा. पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील ., यांच्या मार्गदर्शनखाली पो उप निरी राहुल तायडे, पो उप निरी चंद्रकांत झनके, सफौ दत्रात्रय बडगुजर, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, प्रदीप चौधरी, योगेश बारी, पोकॉ सिध्देश्र्वर डापकर, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे, रतन गिते, छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे, विशाल कोळी अशानी केली आहे.