आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंचच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी ) –
आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंचच्या माध्यमातून अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून आर्या फाउंडेशन चे अध्यक्ष श्री उमेंद्र वाघचौरे व संचालिका डॉ. वंदना वाघचौरे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची उद्घाटन केले,
यावेळी डॉ. वंदना वाघचौरे यांनी शिवरायांच्या जीवन पटातील काही क्षण या ठिकाणी मांडले आणि महामानवांना अभिवादन करणे म्हणजे फक्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करणे नव्हे तर त्यांचे विचार आत्मसात करून आयुष्यात रुजवणे म्हणजेच खरे अभिवादन होय हे उपस्थितांना पटवून दिले,
तसेच हिरकणी महिला मंचच्या सदस्या भावना झा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महिलांच्या प्रति असलेला आदर या ठिकाणी आपल्या शब्दातून व्यक्त केला, आणि छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांना ज्या पद्धतीने सुरक्षित वातावरण होते ,
त्याच पद्धतीने आताच्या काळातील महिलांनाही सुरक्षित वातावरणाची आवश्यकता आहे, यावर आपले विचार मांडले,
या सुंदरशा कार्यक्रमाची सूत्रसंचालन आर्या फाउंडेशनच्या एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या प्राध्यापिका मनीषा बाविस्कर यांनी केले,
तसेच शेवटी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या प्राचार्य रजनी श्रीमती रजनी बडगुजर यांनी आभार व्यक्त केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता खरारे मॅडम परवेज खान सर, डॉ. सुधाकर चौधरी यांनी परिश्रम घेतले, तर श्रीमती आशा पाटील , हर्षा तायडे ,जया इंगळे ,पुष्पा चौधरी ,
लताताई तायडे ,सागर तायडे ,
अशोक बाविस्कर, मनीषा बाविस्कर, इंदिरा भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती..