भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती ल ठिकठिकाणी विविध शाळा महाविद्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात येऊन शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले .

भोळे महाविद्यालय, भुसावळ
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा मांडला. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी दीपक महाजन व विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात
श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ
श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्याहस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराज यांना घडवण्यात जिजाऊ मातेचे महत्वपूर्ण योगदान असून छत्रपतींनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते युगपुरुष होते. असा प्रजापालन करणारा राजा पुन्हा होणे नाही, असे प्राचार्य डॉ.रमेश जोशी म्हणाले. सर्व प्राध्यापकांनी पुष्प अर्पण करून जयजयकार करून आपली मानवंदना दिली. याप्रसंगी प्रा.अनुपम शर्मा, प्रा.हितेश गुप्ता, प्रा.ज्योती ओस्तवाल, डॉ.विवेक जोशी, अनुराग साळुंखे, बद्री प्रसाद केवट, कोमल भट व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प क.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ
शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात समारंभ समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यलयाच्या उप-प्राचार्या डॉ.जान्हवी तळेगावकर होत्या. शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल व कार्यपद्धतीबद्दल प्रथम वर्ष कला वर्गाच्या विद्यार्थिनी कविता बारेला व जयश्री सोनवणे यांनी माहिती दिली. डॉ.जान्हवी तळेगावकर म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या विचारातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांमधून आपण प्रेरणा घेऊन समाजासाठी व देशासाठी कार्य करत राहिले पाहिजे. कार्यक्रमात महाविद्यालयाचे उप- प्राचार्य डॉ.एस.के.अग्रवाल, कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा.अर्चना झिंगरन व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी डॉ.मीना चौधरी, प्रा.के.सी.सूर्यवंशी, प्रा.आर.एच.पाटील, प्रा.निलेश गुरुचल यांनी परिश्रम घेतले.
के.नारखेडे विद्यालय, भुसावळ
शहरातील के.नारखेडे विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांच्याहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रुपल ललित नेहेते व इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी पूर्वी न्हावकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटाविषयी वक्तृत्व सादर केले. याप्रसंगी संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांसहित संगणक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज कुलकर्णी यांनी केले.


