भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघामध्ये भुसावळ विभागातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार संजय सावकारे हे चौथ्यांदा निवडणुकीत उभे राहिले आहे सावकारे यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वांचे लाडके कार्यतत्पर अशी ख्यातीप्राप्त असल्याने पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना विक्रमी विजय प्राप्त व्हावा यासाठी सर्व माता भगिनींचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहे पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने आमदार दिनांक 28 ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी 9 वाजता भागीरथी स्कूल,सोनिच्छा वाडी,आमदार प्रचार कार्यालय समोर, दरडा भवन समोर,जामनेर रोड,भुसावळ येथून निघून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे

तळागाळातील जनतेसह माता भगिनी महिलांना आमदार नेहमीच सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात, महिला सक्षमीकरणासाठी तसेच ईतर सामाजिक उपक्रमासाठी नेहमी प्रोत्साहन देणार्या आमदार सावकारे यांना साथ देण्यासाठी सर्व नागरिक व महिलांनी रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आदींनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ रजनी सावकारे व आयोजकांनी केले आहे .


