भुसावळ –
दिं.२२ॲक्टो.रोजी राज्य शै.संशोधन, प्र.शिक्षण परिषदेने राज्यभरातील इ.९वी च्या लाखो विद्यार्थ्यांची मराठी(प्रथम भाषा)विषयाची “संकलित मूल्यमापन”परीक्षा घेतली. सदर प्रश्नपत्रिकेत प्र.१३ (अ)वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा आहे त्यात ‘ हद्दपार होणे ‘ हा एक वाक्प्रचार दिला असून परिषदेने दिलेल्या उत्तर सूचित त्याचा अर्थ ” जीवनातून कायमचे निघून जाणे” असा दिल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक,जाणकार पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.वास्तविक हद्दपार होणे म्हणजे काही कालावधीसाठी मूळ निवास,गाव,शहर सोडून जाणे असा अर्थ सर्व परिचित आहे.वृत्तपत्रात अनेक वेळा ‘ शांतता ,सुव्यवस्था राहावी म्हणून दोघांना हद्दपरीचे आदेश देण्यात आले” अश्या बातम्या आपण वाचतो .त्यामुळे परिषदेने दिलेला ” जीवनातून कायमचे निघून जाणे ” हा अर्थ न पटणारा वाटतो.
तसेच प्र.१५ दिलेल्या जाहिरातीचे निरीक्षण व प्रश्नांची उत्तरे लिही यात (२) सदर जाहिरातीत तुला जाणवलेल्या दोन त्रुटी लिही .परिषदेने दिलेले उत्तर,” कार्यालयाचा पत्ता,सवलत”हेही योग्य वाटत नाही मुळात त्रुटी नाही.संपर्कासाठी फोन नंबर दिलेले आहेत गरजू व्यक्ती सर्व माहिती फोन करून विचारू शकतात.सवलती विविध प्रकारच्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी,महिलांसाठी,अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी किंवा आणखीही त्या सर्व जाहिरातीत दिल्या तर जाहिरात खूप मोठी होईल,खर्चही वाढेल त्यामुळे ही त्रुटी होवू शकत नाही
शुद्धलेखनाचे नियम पाळले च पाहिजे ह्या शिक्षणखात्याच्या शासन आदेशाचेही पालन न केल्याने शुद्धलेखनाच्या ही अनेक चुका आहेत.आकारिक संकलित मूल्यमापन हे इ १ ते इ ८ वी पर्यंतच करण्याचा शासन आदेश असताना इ ९ वी साठी संकलित मूल्यमापन का? व तेही फक्त तीन विषयांचे च का?शाळांना याबद्दल कोणतेच परिपत्रक नाही. या विषयात विद्यार्थ्यांचा गुणवत्ता स्तर वाढविण्याचा हा मार्ग नाही असेही प्र. ह.दलाल यांनी प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे.



