देवपण जवळुन अनुभवण्याचे भाग्य मला लाभले – जहागिरदाररतन टाटा यांच्या विषयी टाटा मोटर्सचे उपसरव्यस्थापकांच्या भावना


भुसावळ, : लोक देव शोधायला देवळात जातात पण रतन टाटा सरांन सारखे देवपणं असलेली व्यक्ती मला जवळून अनुभवायला मिळाली हे मी माझा भाग्य समजतो. अशी भावना टाटा मोटर्सचे उपसरव्यस्थापक नागेश जहागिरदार यांनी व्यक्त केल्या.

जहागिरदार हे मुळचे भुसावळचे राहणारे पुण्याला टाटा मोटर्स मध्ये कर्मचारी म्हणून लागले व आपल्या कर्तृत्वाने उपसरव्यस्थापकपदा पर्यंत पोहचले. टाटा यांच्या निधना नंतर सकाळी भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले रात्री सर गेल्याचे समजले प्रचंड अस्वस्थ झालो. रात्री तीन वाजेपर्यंत झोपच लागली नाही. जणु घरातील जवळची व्यक्ती गेली असे वाटत होते. रतन अतिशय ऋषीतुल्य व्यक्तीमत्व होते. दर वर्षी एक एप्रिला लेक हाऊस येथे सरांचे वार्षिक संबोधन होत असे तेथे मी नियमितपणे मार्गदर्शन पर व्याख्यान ऐकण्यासाठी जात होतो. त्यांनी मांडलेले विचार, व त्याची उत्तुंग उंची मीच नाही तर समस्थ

जगानी अनुभवली. आश्याच कार्यक्रमात एक एप्रिल २०१९ ला त्यांचा कॅमेऱ्याने फोटो घेण्याची मला सुवर्ण संधी लाभली. त्यांचा साधेपणा मी जवळून बघितला आहे. प्लांट मध्ये आल्यावर कामगारांशी संवाद
साधतं असे, त्यांच्या बरोबर जेवत असे. मला वाटत नाही इतका
साधेपणा कोणी येत्या काळात दाखवू शकेल.
सरांविषयीची अनेक पुस्तके वाचली व जीवनाचा प्रवास बघित्यावर ऐक गोष्ट लक्षात येते, टाकीचे घाव झेल्याशिवाय देवपण प्राप्त होत नाही. अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली मला चाकरी करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मला खात्री आहे, नवीन पिढी त्यांनी आखलेल्या मार्गांवर चालेल व प्रगत राष्ट्र निर्माण करण्यासाठी हातभार लावेल. अशी भावना जहागिरदार यांनी व्यक्त केली.

फोटो ओळी – मुंबई : लेक हाऊस मध्ये कर्मचाऱ्यांना रतन टाटा मार्गदर्शन करतांनाचा क्षण नागेश जहागिरदार यांनी जवळुन टिपला होता.