दिव्यचक्षू भगिनींसाठी रोटरी व लायन्स क्लबच्या भावांची सस्नेह भेट ; बहिणी कडून राखी बांधून घेत दिली तिच्या रक्षणाची ग्वाही ;


भुसावळ – आपल्या बहिणी प्रमाणेच या दिव्यचक्षू भगिनीं आहेत त्यांच्या रक्षणासाठी पुढे सरसावत राखीपोर्णिमेनिमित्त या दिव्यचक्षू भगिनींसाठी भुसावळातील रोटरी व लायन्स क्लबच्या भावांनी पुढे सरसावत बहिणी कडून राखी बांधून घेत बहिणींना तिच्या रक्षणाची ग्वाही दिली .

खान्देश अंधकल्याण संघ भुसावळ येथील भगिनींचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम लिलाई हाँल येथे पार पडला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरती चौधरी, खानदेश अंधकल्याण समितीचे अध्यक्ष संजय पाटील तसेच अंधकल्याण संघाचे मानद पालक डॉ. बाळू पाटील लायन्स तसेच क्लबचे गोपाळ अग्रवाल, झोनल चेअरमन डॉ. उमाकांत चौधरी, डॉ. नरेंद्र भोलाणे, राजेश पाटील, पी. व्ही. पाटील,रोटरी क्लब अध्यक्ष अनंत पाटील,गजानन ठाकूर राजेश अग्रवाल उपस्थित होते.

सर्व प्रथम दीपप्रज्वलन व प्रतिमापुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी राखीनिमित्त दिव्यचक्षू भिगीनी विजया कोरडे यांनी स्वागत गीत व रक्षाबंधनासाठी भावा साठी अतिशय गोड आवाजात गाणे सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी प्रास्ताविक केले या त्यांनी सांगितले की राखी पौर्णिमेच्या सणाला हा भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे आश्वासन देतात याप्रसंगी सर्व भावांच्या वतीने मी सर्व बहिणींना आश्वास्त करते की फक्त आजच नाही तर यापुढेही केव्हाही मदत लागली तर आम्ही सदैव तयार आहोत.

संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले . स्नेहदिप निराधार महिला अंध आश्रम निर्माण व्हावा व यासाठी सर्वानी मदत करावी असे आवाहन केले. नंतर या कार्यक्रमात 22 दिव्य चक्षु महिलांनी रोटरी क्लब व लायन्स क्लबच्या पदाधिकारी बंधूंना राखी बांधली यावेळी यासर्व बहिणींना सस्नेह साडी भेट देण्यात आली .
या कार्यक्रमासाठी गोपाळ अग्रवाल, जयश्री ज्ञाती, संजय चौधरी,मामा पाचपांडे, डॉ. सुरेंद्र भिरुड, प्रमोद नेमाडे,यांनी सहकार्य लाभले.
या प्रसंगी मामा पाचपांडे, गजानन ठाकूर, राजेश अग्रवाल लक्ष्मण सोळंके, राजेंद्र पाटील, संजय चौधरी, सुरेश पाटील, शालीनी पाटील, कावेरी चौधरी. उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संध्या भोळे यांनी अतिशय सुंदर शब्दात केले.
प्रादेशिक मानद पालक डॉ बाळू पाटील यांनी आभार मानले.
या प्रसंगी भुसावळ मधील अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते