भुसावळातील लाडक्या बहिणींनी दिल्या नामदार देवेंद्र फडणवीस यांना लाईव्ह शुभेच्छा : तर आमदार संजय सावकारे यांना राखी बांधून भाऊ पुन्हा तुम्हीच आमदार होणार असल्याचे दिले वचन!!

भुसावळ – भारतीय जनता पार्टीच्या लाडक्या बहिणींनी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे व सौ.रजनीताई सावकारे यांच्या प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी लाईव्ह संपर्क करून रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष युवराज लोणारी यशस्वी आयोजन व सुंदर नियोजन या ठिकाणी दिसून आले त्यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, भाजपा जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बऱ्हाटे,जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे,भालचंद्रभाऊ पाटील भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांतभाऊ पाटील लाडकी बहीण भुसावळ तालुका तालुका अध्यक्ष राजेंद्र आवटे,तालुका सरचिटणीस आनंद ठाकरे,राजेंद्र नाटकर,किरणभाऊ कोलते,गिरीश महाजन देवा वाणी,पुरुषोत्तम नारखेडे,प्रमोद नेमाडे, गुणवंत बोरोले,माजी नगरसेविका सौ.मिनाताई लोणारी,महीला आघाडी भुसावळ तालुका अध्यक्षा सौ.चेतनाताई भिरूड,भुसावळ शहराध्यक्षा सौ.अनिताताई आंबेकर, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे ,सागर वाघोदे,यतीन ढाके,उद्धव झांबरे, गौरव लोणारी,प्रवीण कुटे,संजू विश्वकर्मा,मयूर चीनावले सह असंख्य पदाधिकारी व हजारो माता भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या
तसेच समस्त उपस्थित भगिनींनी भुसावळ तालुक्याचे लाडके आमदार संजय सावकारे यांना राख्या बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा देऊन आपणच या मतदारसंघात चौकार मारणार असे आश्वासन देखील दिले.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून आलेल्या सर्व लाडक्या माता-बहिणींचे लाडू वाटून तोंड गोड करण्यात आले.