धावत्या गाडीने घेतला पेट : संसारोपयोगी साहित्य खाक –

जळगाव : यावल येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर मुकेश महाजन यांची भंडारा येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचे गृहोपयोगी साहित्य बदलीच्या जागी वाहून नेणा-या वाहनाने पेट घेतला. या घटनेत वाहनातील सर्व सामान जळून खाक झाले.

चोपडा-यावल रस्त्यावर गूळ नदीच्या पुलावर ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चोपडापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर देवयानी पेट्रोल पंपाजवळच गूळ नदीच्या पुलावर गाडीने अचानक पेट घेतला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेतील वाहन सावदा येथील होते.