भुसावळ : भुसावळ शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवर असलेल्या गणाधीश अपार्टमेंटमध्ये बुधवारी भर दिवसा अडीच वाजेच्या सुमारास घरफोडी झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. ोरट्यांनी दाराचा कडी-कोयंडा तोडून घरातील चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.
शिवपूर कन्हाळा रोडवर असलेल्या गणाधीश अपार्टमेंटमध्ये विकास सोपान तायडे वास्तव्याला आहेत. कामानिमित्त ते मुंबईला गेल्यानंतर पत्नी प्रियंका तायडे या जळगाव येथे दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास गेल्या मात्र याचवेळी चोरट्यांनी संधी साधली. घरातील कपाटात ठेवलेले चांदीचे दागिणे चोरट्यांनी लांबविले. सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त दागिणे लांबविल्याचे सांगण्यात आले तर सामान अस्ताव्यस्त करीत चोरटे पसार झाले.

प्रियंका तायडे या जळगाव येथे पोचल्यावर त्यांना शेजारच्यांनी फोन करून दुपारी 3.30 वाजता घरफोडीची कल्पना दिली. गणाधीश अपार्टमेंटच्या समोर राहत असलेल्या काही महिलांनी सांगितले की, दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान तीन अज्ञात व्यक्ती तोंडावर मास्क लावून अपार्टमेंटमधून बाहेर पळताना दिसले. पोलिसात मात्र गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.


